ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग लहानांसाठी ( इयत्ता तिसरी ते आठवी वयोगटासाठी ) | ऑनलाईन अभ्यास वर्ग
आजच्या एकविसाव्या युगात अध्यात्म समजून घेणे आणि त्याचा आपल्या जीवनात योग्य वापर करायला शिकणे ही काळाची,आपली गरज आहे. भगवत गीता म्हणजे अध्यात्मिक प्रमुख ग्रंथ. मूळ संस्कृत मध्ये. आपल्या मराठी जणांना समजण्यास थोडा कठीणच, त्याकाळी तर अशक्य.
जवळपास साडे सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितलेली “ज्ञानेश्वरी” आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांनी मराठीत सांगितलेली भगवत गीता. आपल्या अमोल, सुबोध, सुवर्णलंकित मराठी भाषेत माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितली.
पूर्वी, आजही ज्ञानेश्वरी किंवा इतर धार्मिक ग्रंथ कधी वाचतात? वयाच्या पन्नाशी नंतर. मला स्वतःला असं वाटत की, आपण आपली तरुणपणीची वेळवेळ निघून गेल्यावर हे सर्व वाचत आहोत. आजच्या युगात येणाऱ्या प्रसंगांना, अडी अडचणीला, संकटाना समोरे जाण्यासाठी गीता, ज्ञानेश्वरी तरुणपणी / लहानपणी वाचली पाहिजे किंवा समजून घेतली पाहिजे. जेणेकरून आपण आपले व्यक्तिमत्व योग्य वेळीच सुधार. जीवनात योग्य प्रकारे पुढं जावू. .
आपल्या मुलांना आत्तापासूनच ज्ञानेश्वरी समजून घेवू द्यात 🙏 ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून.
ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग लहानांसाठी ( इयत्ता तिसरी ते आठवी वयोगटासाठी )
कालावधी : 18 दिवसांचा अभ्यास वर्ग
दिवस : आठवड्यातून दोन दिवस ( मंगळवार - गुरुवार )
वेळ : 45 मिनिटे. ( मुलांच्या सोयीने योग्य वेळ ठरवण्यात येईल )
अभ्यास वर्ग फी : 418 रुपये | ऑनलाईन अभ्यास वर्ग
संपर्क : +91 9975100120 WhatsApp
लहान मुलांना हा ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग का उपयोगी आहे?
1. मुलांना लहानपणापासून अध्यात्म, योग, ध्यान या गोष्टीची योग्य माहिती मिळते. त्याचे महत्व समजते.
2. मुलांच्यात सकारात्मक जाणीव, संस्कार रुजले जातात.
3. आपल्या मुलांची मातृभाषा मराठी अधिक चांगल्या प्रकारे समजते. अलंकारीक भाषा समजते.
4. मुलांची वैचारिक, बौद्धिक पातळी वाढते. अभ्यासात, शिक्षणात उपयोग होतो.
5. मुलांचे वक्तिमत्व प्रभावीपणे घडण्यास मदत होते. त्यांचा दृष्टीकोन बदलतो.